कुस्ती-मल्लविद्या पन्हाळा तालुका संघटक पदी पै. परशुराम बंगे निवड


कोतोली/ प्रतिनिधी: कुस्तीच्या प्रसिद्धी व प्रसारासाठी  'कुस्ती-मल्लविद्या  महासंघ महाराष्ट्र राज्य ' ही संघटना काम करते . या संघटनेच्या अंतर्गत  पन्हाळा तालुक्यात  विविध पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत  ,यामध्ये कुस्ती-मल्लविद्या पन्हाळा तालुका संघटक पदी आळवे गावचे  पै. परशुराम बंगे यांची  निवड करण्यात आली आहे .
     
पन्हाळा तालुक्यात कुस्तीची मजबूत संघटन बांधणी करण्याच्या उद्देशाने या नियुक्त्या मल्लविद्या संस्थापक अध्यक्ष गणेश मानुगडे, कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राहुल जाधव व पन्हाळा तालुका प्रमुख पै. विक्रम उर्फ विकी माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments