"भाऊ तू बार्शीतून विधानसभा लढावी, कार्यकर्ता म्हणून माझी इच्छा”


अजिंक्यराणा पाटील यांची फेसबुक पोस्ट....

वैराग/प्रतिनिधी;

बाळराजे पाटील यांनी बार्शी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवावी, अशी इच्छा विद्यार्थी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील यांनी व्यक्त केली आहे. बार्शी तालुक्याच्या जनतेसह खास करून युवा वर्गामधून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी होत आहे. कार्यकर्ता म्हणून माझी इच्छा आहे, असं अजिंक्यराणा पाटील यांनी म्हटलं आहे. 

गेल्या पंधरा दिवसापासून सोशल मीडियावर हि बार्शीचे भावी आमदार बाळराजे पाटील असा प्रकारच्या पोस्ट बघायला मिळत आहेत.  तरूणांमधून होत असलेल्या मागणीच्या आग्रहाखातर बाळराजे पाटील यांनी बार्शी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार करावा, अशी विनंती अजिंक्यराणा पाटील यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात फेसबुक पोस्ट केली आहे. 
बार्शी आणि पाटील कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मोहोळच्या जनतेप्रमाणेच बार्शीतील जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद पाटील कुटुंबाच्या पाठीशी राहिलेले आहेत. भविष्यात याच प्रेमाला आम्ही अधिक जवळ करू इच्छितो, असं अजिंक्यराणा यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments