सुनील दळवी, (वाकीघोल)
सयाद्रीच्या कड्या-कपारीत, राजर्षी शाहू महाराजांच्या पद स्पर्श शाने पावन झालेला, वाकीघोल हा अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भाग याच, वाकी घोल ला निसर्गाच खूप मोठं वरदान लाभलय,गेल्याच वर्षी देशातील तीन नंबर आणि महाराष्ट्र 1 नंबर 'पावसाचं ठिकाण हे वाकीघोल आहे.
निसर्गाच वरदान असलेल्या या वाकीघोल च वैभव म्हणजे तोरस्करवाडीचा धबधबा, काळाम्मा धबधबा, कातळ पठार, वनराई, स्वच्छ -सुंदर नद्या, वाकोबा मंदिर, काळाम्मावाडी धरणाचा उगम, दाट धुक्यात हरवलेला रक्षादेवी चा रस्ता, औषधी वनस्पती, पक्षी, जंगली प्राणी, गवारेडा,अश्या बऱ्याच नैसर्गिक विविधीतेने नटलेला, निसर्गाच भरपूर वरदान लाभलेला आमचा वाकीघोल. आज पर्यटकानात भुरळ घालतोय, माझी सर्व लोकप्रतिनिधीना विनंती आहे येणाऱ्या काळात या पर्यटन मार्गातील सर्व रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्र,पूर्ण करावेत जेणेकरून पर्यटकाची ,स्थानिक लोकांची गैर सोय होणार नाही. यामुळे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होतील.
0 Comments