सोलापूर - पंढरपूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार तसेच एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांचे सोमवारी रात्री साडेअकरा वाजता पुण्यात उपचारादरम्यान निधन झाले. त्याच्या निधनामुळे पंढरपूर तालुक्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्यावर पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत मंगळवारी सकाळी ११.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुधाकर पंत परिचारक यांनी आजवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन पद देखील भूषवले. अनेक आजारी कारखान्यांना त्यांनी ऊर्जितावस्था आणली होती. सर्वांनी धीर धरावा, संयम बाळगावा हि विनंती प्रशांत परिचारक यांनी केले आहे.
0 Comments