✍️ अर्जुन रामहरी गोडगे
पळ पळ पाळतो आहे,
जीवाच्या आकांताने मात्र दिशा मात्र हरवली आहे.
कुणाचा कुणाला मेळ नाही,
हृदयाच त्यालाच त्याला कळत नाही.
असचं का जगायचं खोटं खोटं हसायचं,
आपण रडत असलो तरी इतरांना हसवायचं.
स्वप्नांत फक्त फुलायचं,
एकांतात मात्र रडायचं हे असचं चालायचं.
इतकं जगून झाल पण जगायला वेळ नाही,
मग समजत माझं मला कशाचाच कशाला मेळ नाही.
एक वेळ अशी येईल कि घेवून जाईल मला,
अर्ध्यावरच थांबलेली असेल जीवनाची सुवर्णतुला.
अजूनही वेळ आहे पोर थोडं जगून बघ,
महान अशा जीवनाला थोडं उगड्या डोळ्यांनी बघ.
सर्वाना आपल म्हणायचं प्रेम सर्वावर करायचं,
परलोकी जाताना मात्र इथंच सारं विसरायचं.
0 Comments