हॉटेल ओमसाई च्या वतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धा संपन्न

कोल्हापूर:प्रतिनिधी

वाघबीळ येथील हॉटेल ओम साई च्या वतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत केर्ली येथील सचिन मधुकर पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर प्रताप शिवाजी बादरे रा. माले यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. विजेत्यांना कोडोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. 
ऐतिहासिक पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेल ओम साई ग्रुप च्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक उपक्रम राबवले जातात. गेल्यावर्षी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्या पूर बाधितांना आर्थिक मदतीचा आधार देण्यात आला होता. यंदाही कोरोना काळात पोलीस प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्यात हॉटेल ओम साई ग्रुपचा सिंहाचा वाटा असल्याचे मत यावेळी कोडोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरज बनसोडे यांनी व्यक्त केली. खवय्यांसाठी मेजवानी ठरलेल्या येथील हॉटेल ओम साई ग्रुप ला पर्यटकांकडून ही चांगला प्रतिसाद मिळत असतो.

बक्षीस वितरण समारंभाला सनी नलवडे, पैलवान प्रज्वल, वैशाली कांबळे, मिलन पाटील, राहुल कांबळे (मुडशिंगी) अनिल शेलार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments