कांदा, द्राक्षांच्या वाहतुकीसाठी कृषी रेल्वे




जिल्हयात मोठया प्रमाणावर कांदा तसेच द्राक्ष उत्पादन होत असते. यामुळे उत्पादित होणार्याे शेतमालाच्या विक्रीसाठी जलद व सुरक्षित वाहतूक होणे गरजेचे असल्याने नाशिकला उत्तम, निर्जंतूक तसेच वातानुकूलित बोगींची व्यवस्था व्हावी, यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. येत्या ७ ऑगस्टपासून देवळाली कॅम्प येथून कृषी रेल्वे सुरू होत आहे. 

यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यां ना अवघ्या काही तासांत राज्यातील व राज्याबाहेरील बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. शेतकर्यां च्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वेच्या विविध योजना तसेच प्रकल्प नाशिकला व्हावेत याविषयी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठविला होता. कांदा उत्पादनात राज्यात नाशिक जिल्हा अग्रेसर आहे. तर द्राक्ष उत्पादनात जिल्हा राज्यभरात प्रसिध्द आहे. कांदा आणि द्राक्ष ही नगदी पिके असल्याने या उत्पादनावर शेतकर्यांचे आर्थिक गणिते अवलंबून असतात. उत्पादित मालाची जलद वाहतूक आणि विक्री योग्य बाजारपेठ सहज उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

यासाठी वातानुकूलित साठवणूक व्यवस्था उपलब्ध असलेल्या बोगींची अत्यंत आवश्यकता असल्याचे स्पष्ट करत जिल्हयातील शेतकर्यां च्या प्रगतीसाठी आणि जिल्हयाच्या विकासासाठी नाशिकला कृषी रेल्वेने जोडण्याची आग्रही मागणी खासदार गोडसे यांनी संसदेत केली होती. या मार्गावरून कृषी रेल्वे धावणार : त्यानुसार दि. ७ ऑगस्टपासून पहिली कृषी रेल्वे देवळाली रेल्वेस्थानकावरून सुटणार आहे. ही कृषी रेल्वे मनमाड, जळगाव, भुसावळ, बुरहानपूर, खंडवा, इटारसी, जबलपूरमार्गे दानापूर या मार्गावर धावणार आहे. या कृषी रेल्वेचे भाडेही इतर नियमित मेल आणि एक्साप्रेस गाडयांच्या भाडयांपेक्षा कमी असेल.

Post a Comment

0 Comments