तंबाखूच्या व्यसनापासून स्वतःला सोडविण्यासाठीचे हे आहेत रामबाण उपाय व मार्ग,जाणून घ्या त्या बद्दल....
तंबाखू सेवनाने आपल्या भारतात साधारणतः भरपूर लोक विविध आजारांनी मरण पावत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात साधारणतः ३८ टक्के पुरुष व ६ टक्के महिला तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थांचा वापर करतात.
तंबाखूच्या व्यसना पासून स्वतःला सोडविण्या साठीचे मार्ग व उपाय :
◆ निकोटिन गोळीचा वापर करावा.
◆ समतोल आहार,हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध आणि प्रथिनेयुक्त आहाराचा समावेश जेवणात असू द्यावा.
◆ नियमित झोप, व्यायामा ची सवय लावून घ्यावी.
◆ नेहमी सकारात्मक विचार ठेवा, नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका.
◆ सिगारेट कडे मन ओढले जात असेल तर सुमधूर संगीत ऐकायला हवे.
◆ आपल्यावर प्रेम करणाऱ्या, आपल्याला समजून घेणाऱ्या व्यक्तीसोबत राहा.
◆ तंबाखू खावेसे वाटत असेल तर तोंडात चॉकलेट, आवळाकंठी, कॅन्डी टाकावी.
◆ रोज सकाळी उठल्यावर मेडिटेशन करावे.
◆ दर रोज तंबाखू खायचे प्रमाण कमी कमी करावे, असे करता करता तंबाखूचे व्यसन कधी सुटून जाईल तुम्हांला कळणार सुद्धा नाही.
0 Comments