वाठार मध्ये आज अकरा जण कोरोणा पॉझिटिव्ह


लाजरस कदम/ वाठार;
 
हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फ वडगाव मध्ये एस टी स्टँड परिसरातील आज चार दिवसांपूर्वी एक  जण कोरोणा पॉझिटिव्ह व्यक्ती आढळा होता, आज त्यांच्याच घरातील आज त्यांची पत्नी, बहीण, आई व वडील असे चार जणांचे कोरोणा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत .
        
वाठार येथील(निवळे वसाहत ) येथील एकाच कुदूबातील   सहा जनाचा आज कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दोन दिवसांपूर्वी हे कुटुंब मुंबई मधून गावाकडे आले होते. गावातील अजून एक जण असे ११ जण कोरोणा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत  तसेच त्यांच्या घरातील सगळ्यांना  क्वांरनटाईन करण्यात आले आहे. त्या भागामध्ये कॅनटेन्मेंट झोन करण्यात आले आहे, तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने औषध फवारणी केली आहे..एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ३१ झाली आहे. प्रशासनाने आवाहन केले आहे की घरीच रहा,सुरक्षित रहा.

Post a Comment

0 Comments