विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभऱ्यासतिरंगा रंगाच्या फुलाची आरास


पंढरपुर/ प्रतिनिधी ;

 देशभरात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.  कोरोना महामारीमुळे देशात स्वतंत्र दिन शांतेत साजरा केला जात आहे. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र पैकी एक असणाऱ्या श्री विठुराय  रुक्मिणीमातेच्या मंदिरात देखील आज स्वातंत्र्यदिना निमीत्ताने  वेगवेगळ्या आकर्षक अशा  तिरंगा रंगाच्या फुलाची आरास श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली आहे.  

१५ ऑगस्ट स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला झेंडु , शेवंती, लव्हेन्डर अशा विविध फुलांचा वापर करुन देवाचा गाभारा,  सोळखांबी सभामंडप, रुक्मिणी माता गाभारा  तिरंगी रंगात सजवण्यात आला आहे तर देवाच्या अंगावर तिरंगी उपरणे असल्याने देवाचे रुप अधिकच खुलून दिसत होते मात्र विठ्ठल मंदिर बंद असल्याने भाविकाना दे देखणे देवाचे रुप शोशल मिडियाच्या माध्यमातूनच पहावे लागत आहे.

Post a Comment

0 Comments