राम मंदिरासाठी मोदी सरकारने केलेले प्रयत्न कौतुकास्पद - राज ठाकरे



पत्रातून केल्या भावना व्यक्त

अनेक वर्षांपासून जे हिंदुस्थानाचे स्वप्न होते, त्याला आकार देण्यासाठी मोदींनी सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत. अयोध्येतील राम मदिरासाठीची न्यायालयीन लढाई असो की सर्वसहमतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या सरकारने जे प्रयत्न केले ते निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत, असे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. बुधवारी होऊ घातलेल्या राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला राज ठाकरे यांनी पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. 

ह्या राम मंदिर लढाईत अनेकांनी जीव गमावला आहे, खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळाला आहे. आपल्या रामाचा वनवास संपला. उद्या राममंदिराचं अयोध्येत भूमिपूजन होणार, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यातील हा एक क्षण आहे. अर्थातच या क्षणी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, आज ह्या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते, त्यांना मनापासून आनंद झाला असता, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments