कोरोना सेंटरमध्ये विघ्नहर्त्याचे आगमन, मंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते प्रतिष्ठापना



कागलमधील कोविड सेंटरमध्ये आज गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपतीची प्रतिष्ठापना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आली. जिल्ह्यात नवीन शंभर बेडचे नवे कोविड सेंटर तयार करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटनही हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. 

“कोविड केअर सेंटरमध्ये गणपती प्रतिष्ठापना करणारे राज्यातील पहिलेच उदाहरण कोविड केअर असावे असा दावा यावेळी मुश्रीफ यांनी केला. त्यासोबतच विघ्नहर्त्याकडे त्यांनी कोरोनाचे संकट लवकर दूर कर”, अशी प्रार्थनाही केली. सध्या देशासह राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी साध्या पद्धतीने व सोशल डिस्टन्सचा नियम पाळावा अशी. त्यासोबत गणेशाचे विसर्जनही कृत्रिम तलावात करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेश मंडळांकडूनही स्वागतार्ह पाऊल उचलले जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपत अनेक गणेश मंडळांनी खबरदारी म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Post a Comment

0 Comments