राज्यपालांनी ७९ व्या वर्षी पायीच केला शिवनेरी सर....



राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज शिवनेरीला भेट दिली आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेबांचं दर्शन घेतलं. राज्यपालांनी पायीच हा गड सर केला. आतापर्यंत राज्याचे कोणतेच मुख्यमंत्री किंवा राज्यपाल किल्ले शिवनेरीवर पायी आलेले नाहीत. 

"कोणी कसं यावे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. माझी श्रद्धा होती म्हणून मी पायी आलो. शिवनेरीवर येण्यापूर्वी अनेकांनी मला तिथे पाऊस आहे. चिखल आहे. शिडी चढून जावे लागेल असे म्हणून घाबरवले होते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन होणे हा माझ्या भाग्याचा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्तीमत्व नव्हते तर ते अवतारी पुरुष होते. त्यांच्यासारख्या महापुरुषांकडून प्रेरणा मिळते. ते खरे पूजनीय आदर्श आहेत. 

शिवजन्मस्थळी आल्यावर महाराजांच्या आयुष्यातील कर्तृत्व प्रवासाकडे ध्यान जाते. यापुढील काळात राम, कृष्ण, गुरु गोविंदसिंग,छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत जेणे करून जग आपल्या देशाकडे तिरक्या नजरेने पाहू शकणार नाही. यावेळी त्यांनी संपूर्ण शिवनेरी गडाची पायी चालत पाहणी केली. गडावरील शिवाई देवतेची आरती करून त्यांनी दर्शन घेतले. 

Post a Comment

0 Comments