राकेश करमळकर/आजरा;
शहरांमध्ये समूह संसर्गाचा धोका वाढत असतानाच रविवार दि.२ रोजी आज शहरांमध्ये नव्याने सात जण कोरोना बाधित झाले आहेत. यापूर्वी कोरोना बाधित झालेल्या तरुणाचे ६ जण नातलग आहेत व एक जण मित्र आहे. शहरांमध्ये अमराई गल्ली,हैदर नगर यापूर्वीच प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे.
प्रशासनाने याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे पण प्रतिबंधित क्षेत्रातील काही लोक प्रशासनाची नजर चुकवुन गावामध्ये राजरोस फिरताना दिसत आहेत त्यामुळे शहरांमध्ये समूह संसर्गाचा धोका वाढू शकतो. समूह संसर्ग टाळण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबरच नागरिकांची असल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनी आपली जबाबदारी पाळणे गरजेचे आहे.
आज नव्याने सात जण पॉझिटिव्ह आल्यामुळे तालुक्यातील रुग्णांची संख्या आता १४२ इतकी झाली आहे.
0 Comments