भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यामध्ये सहभागी भाग्य लागले असे प्रतिपादन ह.भ.प. कुंडलिक महाराज यांनी केले, रामफरी काढली त्यावेळी व्यक्त केले.
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेच्या वतीने
राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी राजराजेश्वर गिरिजी महाराज, राष्ट्रीय महासचिव डॉ. गिरीजी महाराज यांच्या सूचनेनुसार बार्शी तालुक्यात ह.भ.प. महाराज पुंडलिक पाटील महाराज धामणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुक्यात विविध ठिकाणी सोहळा उत्साहात संपन्न झाला. श्री क्षेत्र धामणगाव येथे राम फेरी काढून, भजन करुन भगव्या ध्वजाचे पूजन करुन, श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून नाम घोषाचा जयजयकार करण्यात आला. कार्यक्रमानंतर भाविकांना पेढे,केळी, श्रीफळ इत्यादीचा प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले.
तालुक्यात आळजापूर, गोरमाळे ,काटी, पांगरी, पिंपळगाव, भोयरे, ममदापुर, सरोळे, कासारी इत्यादी गावातूनही मोठ्या उत्साहात श्रीरामाचा गजर करत कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले
याप्रसंगी विनायक देशमुख इलाई तांबोळी, विष्णू ढेकने, बबनदास बैरागी, बाबा शिंदे, श्रीहरी जगताप, मानस हुंबे, काका जगताप, रामचंद्र शिंदे, शिवाजी तेलंग, विरो गणपत जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments