राकेश करमळकर/आजरा;
आजरा शहरात आज पुन्हा नव्याने आणखी तीन जणांचा अहवाल एका खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह आला आहे. तिघांमध्ये ५४ व ३१ वर्ष वयाच्या दोन महिला आणि ८ वर्षे वयाचा मुलगा आहे. सदरचे बाधित रुग्ण एकाच कुटुंबातील असून आता एकाच कुटुंबातील कोरोना रुग्णांची संख्या बारा इतकी झाली आहे.
चार दिवसापूर्वी याच कुटुंबातील एका व्यक्तीचा मृत्यू कोरोना मुळे झाला होता. शहरातील कोरोना बाधितांचे संख्या १९ इतकी झाली आहे. तर तालुक्यामधील कोरोना बाधितांची संख्या १३५ इतकी झाली आहे तर १०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, आत्तापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.
0 Comments