आजरा तालुक्यात पुन्हा पावसाचा जोर, 2 बंधारे पाण्याखाली; अतिवृष्टीमुळे वित्तहानी


          
राकेश करमळकर/आजरा :

आजरा तालुक्यामध्ये गेले चार-पाच दिवस शांत झालेल्या पावसाने काल शनिवारी रात्रीपासून जोरदार सुरुवात केली आहे. आजरा तालुक्यामध्ये दि.१ जुन २०२० ते १६ रोजी सकाळी १०.०० पर्यंत  सरासरी  -१६८२.५० मि.मि. इतका  पाऊस पडला आहे. 

तालुक्यामध्ये काल सायंकाळ पासून आज सकाळी १० पर्यंत सर्वात जास्त गवसे येथे ९५ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे तर आजरा शहरांमध्ये ८७ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यामध्ये साळगाव व ऐनापूर या बंधाऱ्यावरती तिसऱ्यांदा पाणी आले आहे. या बंधाऱ्यावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.या मार्गावरील वाहतूक इतर पर्यायी मार्गावर वळवण्यात आली आहे.
              
रात्रभर संततधार पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यामध्ये काही घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. सुदैवाची बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. 
तालुक्यात पडलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी खालीलप्रमाणे.
१. मौजे - देवकांडगाव
सुभाष विष्णू परीट
घरातील एकूण व्यक्ती  - ४
पूर्ण घर पडून नुकसान अंदाजे रक्कम - ३,००,००० रु. 

२.मौजे- कोरीवडे 
शिवाजी गणपती पाटील 
कुटूंबातील व्यक्ती - ५
अंदाजे नुकसान ५०,०००/-

३. मौजे पेरणोली 
 रोजीन रेमेत फर्नांडिस  
घरामध्ये ०२ व्यक्ती 
अंदाजे नुकसान - ५००००/-

४. घर पडझड 
मौजे पेरनो ली , तालुका आजरा.
कमल आनंदा जाधव 
घरातली एकूण व्यक्ती - २
घराची भिंत आणि वासे पडून आंदाज नुकसान रू. ५०,००० /-

५.गिता बंडु नवले रा. दाभिल 
अंशता घर पडझड
मा-५ नुकसान -३००००/-
६.मोरबाळे इंदु गोविंद रा.आजरा
अंशता घर पडझड नुकसान-२०,०००/-
अशा सहा कुटुंबांचे सुमारे पाच लाख रुपये इतके नुकसान झाले आहे. संततधार पडणाऱ्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तालुक्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन दक्ष आहे.

Post a Comment

0 Comments