प्रताप उर्फ भैय्या माने यांची कागल तालुका संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी निवड



कागल : प्रतिनिधी
कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी प्रताप उर्फ भैय्या यशवंतराव माने यांची निवड झाली. या निवडीचे पत्र श्री. माने यांना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पाठविले आहे.

 आमचे नेते ग्रामविकास मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी मला ही संधी दिलेली आहे. यापूर्वीही मला अध्यक्ष म्हणून जी संधी मिळाली होती, त्या माध्यमातूनही वंचितांना न्याय मिळवून देण्याची भूमिका मी पार पाडली आहे. त्याचपद्धतीने गोरगरीब अंध-अपंग, विधवा, परित्यक्त्या व ६५ वर्षावरील स्त्री-पुरुषांना या माध्यमातून सुखाचे चार घास देऊन त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवीन अशा प्रकारचा विश्वास नूतन अध्यक्ष भैया माने यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments