कोल्हापुरात आज ५१३ रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह; संपुर्ण जिल्ह्यास कोरोनाचा विळखा


गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल ५१३ कोरोना बाधितांची भर पडली. आज सकाळी १० पासून रात्री ८ पर्यंत ३१७ नवे रुग्ण आढळले.गेल्या २४ तासांत ५०६ नवे रुग्ण आढळले असून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण ५५८१ रुग्ण आहेत. आज सकाळपासून १४९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, आजपर्यंत एकूण २२७६ डिस्चार्ज देण्यात आले.

तर आज दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला असून, कोरोना मुळे आजपर्यंत एकूण जिल्ह्यात १५७ मृत्यू झाले. सध्या जिल्ह्यात एकूण ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ३१४८ इतकी आहे.






Post a Comment

0 Comments