खाजगी हॉस्पिटलमध्ये शासनाच्या नियमानुसार बिलाची आकारणी ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना




कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व खाजगी रुग्णालयांनी सकारात्मक प्रतिसाद देवून कोविड हॉस्पिटल सुरु करा, कोरोनावर उपचार करताना खाजगी रुग्णालयांनी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसारच आकारणी करावी. शासन निर्णयानुसार दर आकारण्यात आले आहेत का याबाबत तपासणी करावी. कोरोना बाधित तसेच इतर आजाराबाबत सर्व रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. आयसीएमआरच्या सुचनेनुसार कोरोना बाधित रुग्णांची  माहिती तात्काळ एन.एच.पी पोर्टलवर भरावी. अशा सूचना जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिल्या.

कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजनेबाबत शासकीय विश्रामगृह  येथे बैठक घेण्यात आली. बैठकीस आमदार भारत भालके, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यलायाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी सागर कवडे, तहसिलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे, डॉ. पुष्पा अग्रवाल, आयएमएचे डॉ.पंकज गायकवाड, डॉ.देशमुख आदी उपस्थित होते.

 आमदार भारत भालके म्हणाले, पंढरीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोनेसाठी खाजगी रुग्णालये व शासकीय रुग्णालयांनी समन्वयाने काम करावे,  उपचारा अभावी कोणताही रुग्ण वंचित राहता कामा नये.  सर्व अधिकारी यांनी समन्वाने काम करावे. पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यासाठी हायफलोनेझल ऑक्सिजन यंत्रणा खरेदीकरण्यासाठी आमदार फंडातून निधी उपलब्ध करुन दिली जाईल.

 पंढरपूरातील रुग्णालयातील रुग्णांच्या व्यवस्थेची पाहणी जिल्हा समितीने केली.  जनकल्याण, ॲपेक्स, गॅलेक्सी, गणपती, विठ्ठल आदी हॉस्पिटलची पाहणी केली, रुग्णांसाठी आवश्यक सोयी, सुविधा, कोविड वार्ड, ऑक्सिजन व्यवस्था,  मनुष्यबळ, महात्मा फुले जन आरोग्य योजना आदींची माहिती घेऊन आवश्यक सूचना केल्या.  नारायण चिंचोली येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथील  प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली.  कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होवू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यकती दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी केल्या.

◆ माध्यम प्रतिनिधीसमोर आ. भालके आक्रमक..

पंढरपूर येथील कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजनेबाबत शासकीय विश्रामगृह  येथे बैठकीनंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माध्यमाशी बोलत असताना आ. भारत नाना भालके हे अचानक आक्रमक झाल्याचे दिसले. आ. भालके हे जिल्हाधिकाऱ्याना बोलताना म्हणाले, तुम्ही जिल्हा उपरुग्णालयातील कोविंड सेंटर बंद करून नका. सरकारी बंद करून तुम्ही खाजगी हॉस्पिटल सुरू करण्याची कोणीही परवानगी देणार नाही. असे म्हणत आ. भालके आक्रमक होताना दिसले.

Post a Comment

0 Comments