भारतीय क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुली यांना कोरोना झाल्याचे पुढे आल्यानंतर सौरवने स्वतःची देखील कोरोना चाचणी केली होती. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.
( फोटो सौजन्य:- दै जागरण)
भावाला कोरोनाची लागण झाल्याचं कळताच सौरवने स्वतःला क्वारंटाइन करून घेतले आणि खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना चाचणी केली. स्नेहाशिष गांगुली हे बंगाल क्रिकेट संघटनेच्या सहाय्यक सचिवपदी कार्यरत आहे. त्यांच्यावर सध्या महानगरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर गांगुली घरातूनच बीसीसीआयचा सर्व कारभार करत आहे.
दरम्यान कोरोना महामारीच्या काळात गांगुली व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठका घेत आहे. कालच बीसीसीआयने आयपीएलची अधिकृत घोषणा केली होती. आयपीएलच्या अध्यक्षपदी असणाऱ्या ब्रिजेश पटेल यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला शुक्रवारी याबाबतची माहिती दिली. १९ सप्टेंबरपासून ८ नोव्हेंबरपर्यंत संयुक्त अरब अमिराती येथे हे सामने पार पडणार आहेत.
0 Comments