कल्याण येथील महापालिकेच्या स्वॅब टेस्टिंग सेंटर यांचा ऑनलाईन शुभारंभ;उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्नमुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज डोंबिवली येथील पाटीदार भवन व कल्याण येथील आसरा फाऊंडेशन येथे कोविड रुग्णांसाठी समर्पित आरोग्य केंद्र, त्याचप्रमाणे गौरीपाडा, कल्याण येथील महापालिकेच्या स्वॅब टेस्टिंग सेंटर यांचा ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला.

डोंबिवली पूर्व येथील पाटीदार भवन येथे प्रशस्त जागेत कोविड समर्पित आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. याठिकाणी एकूण २१० बेड रुग्णांसाठी उपलब्ध असून २००बेड ऑक्सिजनची सुविधा असलेले आणि १० सेमी आयसीयू बेड आहेत. या इमारतीत डॉक्टर्स, त्यांचे रहिवास, रेस्टरुम व त्यांचे कार्यालय असणार आहे.

कल्याण(प) येथील आसरा फाऊंडेशनच्या जागेत कोविड आरोग्य केंद्र उभे राहत असून त्यामध्ये १०० ऑक्सिजन बेड, ८४ नॉर्मल बेड, १० सेमी-आयसीयू बेडची सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध असणार आहे. कल्याण(प) येथे महापालिकेचे स्वॅब चाचणी केंद्र PPP तत्वावर तयार होत असून तेथे दररोज ३००० चाचण्या होवू शकतात.

Post a Comment

0 Comments