कोरोना आणि आमची भरकटलेली मानसिकता

✒️अभिजीत विलास कोतोलीकर                   मोबाईल:९६७३५७४३७२

  शहरात राजेरोस फिरणारा कोरोना गावच्या वेशीत येऊन कधी धडकला कळलंच नाही. कोरोनाचा गावात शिरकाव होतोना होतोय तोच कोणीतरी बोललं अर्रर्रर्रर्रर !!आमच्या गावात शीट बसली!! आणि धडाधड स्टेट्स अपलोड झाले, बातमी हहहहह म्हणता फक्त गावापूर्ती मर्यादित न राहता अख्या परिसरात झाली.  जणू काही कोरोना बाधित व्यक्तीने कोणाचा तरी खुनच केलाय।। खरं म्हणजे गावात शीट बसली!!या स्टेटसच कोडंच काही उलगडलं नाही. नाही म्हणजे कसं आहे,  ग्रामीण भागात येणं निवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवारांबद्दल शीट बसली अस सर्रास म्हणारानी भोळीभाबडी माणसं पाहिली पण आज कोरोना झाल्यावर शीट बसली म्हणणारी युवा पिढी आणि त्याच जोशात स्टेटस ठेवणारी मंडळी पहिली की प्रश्न पडतो की आम्ही मॉर्डन झालो की आमचे विचार मॉर्डन झाले?  की, या सगळ्यापलीकडे जावून आम्ही आमची माणुसकी ,सहानुभूती,आपलेपणा, प्रेम, आदर हे ऐकायला बरे वाटणारे शब्द विसरलो की मुद्द्यांम याचा आम्हाला विसर पडला की, आता हे सगळे शब्द आम्ही काळाच्या ओघात गुंडाळून ठेवले की काय?? हा खरंच आजच्या घडीला पडलेला सर्वात मोठा प्रश्न?
याच उत्तर सगळयांकडे नक्की आहे, फक्त आम्ही स्वतःमध्ये इतकं हरवलो आहे की, या क्षणी कोरोना झालंच तर तो दुसऱ्यामुळे होईल माझ्यामुळे अजिबात नाही, मास्क वापरायचं असेल तर तो समोरच्याने वापरावा, मी नाही, आणि काळजी घ्यायचीचं असेल तर त्याला घेऊ दे मला आता तरी गरज नाही, या सगळ्या गोष्टीमुळे कोरोना उंबरठ्यावर आला तरी आम्ही अजून आमच्यात रममाण आहोत आणि चुकून जरी एखाद्याला कोरोना झालाच तर कोठ गेला होता मरायला? आता अख्ख गावंला कोरोना करेल हे ठरलेलं वाक्य आम्ही बोबलायला मोकळंच असतो, आजच्या क्षणाला आमची मानसिकता इतकी भरकटलेली आहे की, आम्हाला नेमकं चूक आणि बरोबर यातला फरक समजणं अवघड होऊन बसलंय, आणि काहींनी तर झोपेचं सोंगच घेतलं आहे त्यामुळे त्यांना या कोरोनाच काही घेणदेणंच नाही.

      कोरोनासंदर्भात उपाययोजना करण्यात नेमकं फेल गेलंय तरी कोण,  केंद्र सरकार, राज्य सरकार जि.प, की आमची ग्रामपंचायत ?? हे कोणीच फेल गेलेलं नाहीत आणि जाणार देखील नाहीत कारण फेल गेले आहेत ते नागरिक, आणि त्यांची भरकटलेली मानसिकता। सुजाण नागरिक म्हणून आपण जो ऊर बडवून घेतो ना तो ऊर आता आपण किती चुकलोय म्हणून बडवून घेण्याची वेळ आलीय. कोरोना पासून संरक्षण करणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे, त्यापेक्षा ती जास्त आपली स्वतःची आहे. पण आमच्याकडे अस काही होत नाही कारण आम्ही फक्त शहाणपणाच्या निव्वळ पोकळ गप्पा हाणतो. आणि मग दुसऱ्याने नियम कसा तोडला हे सांगण्यात पटाईत असणारे आम्ही स्वतः नियम मोडताना जरा सुध्दा मागे पुढे बघत नाही, कारण ""तो मी न्हवेच।" हे आम्ही इतकं मनावर बिंबवल आहे की "आम्ही काही करो"पण मान्य करण्याची दानत आमच्यात नाही , कधी काळी होती म्हणे, पण आता अजिबात नाही. आज परिस्थिती इतकी हाताबाहेर गेलीय की पोलिसांना आमच्या ढुंगणावर काठ्या मारव्या लागत आहेत की लेका आता गप्प घरी जा!  

मास्क नाही लावला तर दंड होईल.प्रशासन नियम बनवतं आणि  खालच्या स्तरापर्यंत पाठवत असतं। त्यानियमाचे आम्ही करतो काय तर बॅनर लावतो, नवनवीन व्हिडिओ बनवतो, मोठी जनजागृतीपर जाहिरात करतो, इतकाच काय दक्षता समिती देखील नेमतो। *पण, या शासकीय बाजूच्या पुढे आमची धाव असते आम्ही सोशल मीडियावर इतकं काही भरभरून टाकतो, स्टेट्स ठेवतो पण प्रत्यक्ष अंमलात यातलं आणतो तरी किती?? काहीच नाहीं , कारण आमची मानसिकता इतकी कठोर झालीय की ती बदललं म्हणजे स्वतःची तत्त्व बदल्यासारखी लोकांना वाटतात! आज कोरोना फक्त शहरापुरता मर्यादित होता असा आमचा गोड गैरसमज होता  पण तो समज आता किती खरा ठरला आहे हे डोळयांनी आपण बघतच आहोत. देशाच्या अर्थव्यवस्थेच कंबरड कधीच मोडलं आहे, शहरं तर कधीच बकाल झाली आहेत, आपली खेडी उद्धवस्त होऊ द्यायची नसतील तर आता खरंच आपल्याला सावरायला हवं, आणि आपल्या भरकटलेल्या विचाराचा पसारा आवरायला हवा, तेव्हाच आपण सुखान जगू, नाहीतर अनेक जण उभं आयुष्य मागे सोडत, आपल्या प्रियजणाना, घरच्यांना अंतिम दर्शन न देताच, बेवारशासारखी जगाचा निरोप घेऊन गेली आहेत, आपली ही गत तशीच व्ह्यायची नसेल तर निदान आता आपण सावरलं पाहिजे आणि आपल्यात सुधारणा केली पाहिजे, स्वतःची काळजी घेत इतरांची देखील काळजी घ्यायला हवी, अफवा न फसरता एकमेकांना धीर दयायला हवा,। बाधित कुटुंबाला धीर दिला पाहिजे त्यांच्या पाठीशी उभं राहील पाहिजे, सर्वजण एकत्र लढलो तरच कोरोना हरणार आहे.  हे सगळं जेव्हा कृतीत होईल तेव्हाच तुमची आमची समृद्ध खेडी सुरक्षित आणि समृद्ध रहाणार आहेत, नाहीतर ? उध्दवस्त खेड्यांसोबत मरण स्वस्त होतंय इतकंच।।

(टीप: लेखातील सर्व मते वैयक्तिक आहेत)

Post a Comment

0 Comments