कोतोली(28): पन्हाळा येथील एकलव्य कोव्हीड सेंटरमध्ये उपचारानंतर बरे झालेल्या रूग्णांचे प्रमाण वाढत असून कोतोली येथील बाधित रुग्णांपैकी दिनांक 27 जुलै, 2020 रोजी एकूण 14 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे अशी माहिती सरपंच प्रकाश पाटील यांनी दिली आहे.
पन्हाळा तालुक्यातील कोव्हीड १९ रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. पन्हाळा येथील एकलव्य कोव्हीड सेंटरमध्ये कोरोनाच्या तात्काळ उपचारानंतर दिनांक 27 जुलै , 2020 रोजी कोतोली येथील 12 रुग्ण, तर सिपीआर रुग्णालयातुन 2 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. एकूण बरे झालेल्या रूग्णांचे प्रमाण वाढत असून कोरोनाची साखळी तोडण्यात यश मिळत आहे.
कोव्हीड १९ च्या संशयित रूग्णांसाठी स्वतंत्रपणे उपचार करण्यात येत आहेत. त्यासाठी आवश्यक असणा-या सर्व सुविधा पन्हाळा कोव्हीड सेंटरमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पन्हाळा येथील एकलव्य कोव्हीड१९सेंटर मध्ये बाधित रुग्णांसाठी आयसोलेशनची प्रभावी यंत्रणा, योग्य उपचार पद्धती आदी उपाययोजनामुळे कोरोना कोव्हीड १९ बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.
दरम्यान कोतोली येथील बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांना पन्हाळा येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येत होते परंतु त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सरपंच प्रकाश पाटील यांनी तहसीलदार यांच्याशी पत्रव्यवहार करून कोतोली येथे क्वारंटाईन सेंटरची मागणी केली होती, ही मागणी वरिष्ठ स्तरावर मान्य झाली असून कोतोली येथील नेहरू विद्यामंदिर व ज्यू.कॉलेज येथे सेंटरसाठी परवानगी देण्यात आली आहे. बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींना आता गावातच क्वारंटाईन करण्यात येत असून दक्षता समितीच्यावतीने त्यांना चहा, नाश्ता जेवण पुरविण्यात येत आहे.
0 Comments