सोलापूरची यंदाची दिवाळी ही राजकीय वादाची ठरली आहे. यंदा राजकारणात जनावरे गाजू लागली आहेत. लबाड लांडग्याने मार्केट मारल्यानंतर गाढव चर्चेत आले. हे होत नाही तोपर्यंत कुत्र्याने राजकारणात एन्ट्री केली.
भाजपचे युवा आमदार देवेंद्र कोठे यांच्या तोंडून लबाड लांडगा निघतोय तोच खासदार प्रणिती ताईंनी लांडग्याचे सोंग बाहेर काढले. नंतर तर कोठेंच्या तोंडून ताईंना गाढवाची उपमा दिली गेली. चेतन भाऊंनी तर प्रतीकात्मक ऐवजी दोन जिवंत गाढव आणून दादांना डिवचले त्यानंतर हे भांडण कुत्र्यावर गेले.
या जनावरांची भांडणे शांत होत नाहीत तोपर्यंत अक्कलकोट मध्ये आता आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात नवा वाद पेटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना यांना म्हेत्रे यांनी एकेरी भाषेत उल्लेख करत त्यांचा बाप काढला. त्यावर ते गप्प बसले नाहीत त्यांनी अक्कलकोट तालुक्यातील विकास कामांच्या टक्केवारीवर बोलताना हे काम मिळतात तर कोणाला तर बायकोच्या भावाला असे म्हणत कल्याणशेट्टी यांच्या मेव्हण्यावर भाष्य केले. बायकोचा भाऊ अन्..... असे म्हणून डिवचले.
त्यावर कल्याणशेट्टी यांनी त्याच भाषेत आणि अरे तुरे वर उत्तर दिले. कल्याण शेट्टी म्हणाले म्हेत्रेनी उभ्या आयुष्यात टक्केवारीचा धंदा केला, दोन नंबर धंदे केले, त्यामुळे म्हेत्रेच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही. स्वतःचा मेव्हणा मात्र गुटखा खाऊन दारात येणाऱ्या जाणाऱ्यांना पैसे मागत फिरत होता, अशा माणसाने दुसऱ्याच्या कुटुंबावर बोलताना काळजी घ्यावी असा टोला त्यांनी हाणला.
0 Comments