एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत; सोलापुरात विसर्जन मार्गांवर झळकले बॅनर


अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन आज मोठ्या उत्साहात होत असताना सात रस्ता परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळावी, अशी प्रार्थना करणारे बॅनर झळकले आहेत.

"भाई, सरकार आपण पुन्हा मुख्यमंत्री पदी विराजमान व्हावे, हीच गणराया चरणी प्रार्थना" असा संदेश या बॅनरवर देण्यात आला आहे.

शहरातील प्रमुख विसर्जन मार्गांवर आणि लष्कर मध्यवर्ती भागात हे बॅनर लावण्यात आले असून, जवळपास दीडशे सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका या मार्गांवरून जाणार आहेत. त्यामुळे या बॅनरची भाविक आणि नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

हे बॅनर शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी लावले असून, विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणारे गणेशभक्त, मंडळांचे कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे.

गणरायाच्या कृपेने एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी भावना व्यक्त करत गणपती बाप्पा आपली इच्छा पूर्ण करेल, असा विश्वास मनीष काळजे यांनी व्यक्त केला.



Post a Comment

0 Comments