बार्शी तालुका पोलिसांचा बाभुळगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा


बार्शी - तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचा पोलीस स्टाफसह अवैध धंद्यांवरील कारवाईचा धडाका सुरूच आहे. रविवारी बाभुळगाव येथे जुगार खेळणाऱ्या 13 आरोपींवर गुन्हे दाखल करून 2,32,930 (2 लाख 32 हजार 930 ) रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांचे समूळ नष्टीकरण व्हावे याकरिता बार्शी तालुका पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांनी अवैध धंदे करणाऱ्यांवर धडक मोहीम हाती घेतली असून बाभुळगाव येथे काही इसम पत्ते जुगार खेळत असले बाबत गोपनीय माहिती प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ स्टाफसह सदर ठिकाणी छापा मारून अवैध क्लब पत्ते जुगार खेळणाऱ्या इसमांवर धडक कारवाई करून 2 लाख 32 हजार 930 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. बार्शी तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 242/26 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 अ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींची नावे खालील प्रमाणे

1) चांगदेव मुकुंद लोंढे
2) धनंजय भगवान शिंदे 
3) निलेश गजेंद्र शिंदे 
4) किशोर विक्रम शिंदे
5) गोरखनाथ एजिनाथ शिंदे 
6) सिद्धेश्वर चंद्रा शिंदे 
7) गणेश मिटू नवले 
8) विजय हरिदास अडसूळ 
9) चंद्रकांत दशरथ झिने 
10) लक्ष्मण पांडुरंग झिने 
11) भरत पंढरीनाथ शिंदे 
12) विजय विठ्ठल शिंदे
13) पांडुरंग श्रीधर उघले 
 सर्व राहणार बाभूळगाव , तालुका बार्शी 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे,पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे, राजेंद्र मंगरूळे,अरुण डुकळे, सागर वाकळे, शशिकांत लोकरे, महेश माने, शिवशंकर खराडे

Post a Comment

0 Comments