भूम |
ईट (ता. भूम, जि. धाराशिव) येथील निकिता अमरनाथ थोरात (वय २२) यांनी १४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी माहेरच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून फौजी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत निकिता यांच्या आई जिजाबाई सुदाम कांबळे (वय ४६, रा. लांजेश्वर, ता. भूम) यांनी १७ जुलै २०२६ रोजी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत, माहेरहून हुंडा आणण्याची मागणी तसेच पतीचे कथित अनैतिक संबंध यावरून निकिता यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या फिर्यादीवरून अमरनाथ उद्धव थोरात (फौजी), मुद्रुका उद्धव थोरात, उद्धव जगन्नाथ थोरात (सर्व रा. ईट, ता. भूम), गीता अश्विन मोरे (रा. विमाननगर, सम्राट चौक, लेन क्र. १४, पुणे) आणि अश्विनी पांडुरंग खवळे (वय २२) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, १०८, ११५(२), ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments