कळंब पोलीसांची धडक कारवाई - वाहन चोरीचे 4 गुन्हे उघड, 70 हजारांचा मुद्देमाल जप्त


कळंब |

शहरात वाढणाऱ्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कळंब पोलीसांनी धडक कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक शकील शेख यांच्या पथकाने एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 4 चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित लखन उर्फ उमेश उत्रेश्वर दळवी, वय 24, रा. कळंब याला पोलीसांनी संशयावरून ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने शहरातील विविध ठिकाणाहून 4 मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली.

त्याच्याकडून HF Deluxe, Splendor Plus, Twister आणि एक अन्य मोटरसायकल असा एकूण अंदाजे 70,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या गाड्यांपैकी 3 गाड्या कळंब शहरातील गुन्ह्यांशी संबंधित आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. 
पोलीस निरीक्षक शकील शेख यांच्यासह पोहेकॉ अजिज शेख, जुबेर काजी, पोअं परमेश्वर कदम व अमोल माळी यांनी ही कारवाई केली.संशयितावर चोरीचे गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments