काँग्रेसच्या चेतन नरोटे यांनी पालकमंत्र्यांना डिवचले ! माण पंचायत समिती सभापतीचे पोस्टर सोलापुरात


सोलापूर : बुधवारी सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष विराजमान झाला. स्वतः पालकमंत्री जयकुमार गोरे हे जिल्हा परिषदेमध्ये उपस्थित होते यापूर्वी सोलापूर महानगरपालिकेवर सुद्धा एक हाती सत्ता आणून भाजपने आपली ताकद दाखवून दिली त्याचे किंग मेकर सुद्धा पालकमंत्री जयकुमार गोरे हेच ठरले. 

दरम्यान सोलापुरात काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना चांगला चिमटा काढला आहे पालकमंत्र्यांच्या मान तालुक्याचे पंचायत समिती सभापती झालेले विक्रम शामराव शिंगाडे यांना शुभेच्छा देणारे पोस्टर सोलापूरच्या मुख्य चौकात म्हणजेच सात रस्ता या ठिकाणी लावले आहे.

अपनी ताकद पर इतना घमंड मत करना ! माना की आज तुम बलवान हो लेकीन याद रखना ! समय आपसे भी बडा बलवान होता है....! अशा शब्दांमध्ये काँग्रेसच्या नरोटे यांनी पालकमंत्री गोरे यांना हिनवले आहे.

Post a Comment

0 Comments