६ मिनिटांसाठी आली आणि तब्बल ६ कोटी घेऊन गेली? अभिनेत्रीचं मानधन ऐकून नेटकरी अवाक



दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्येही आपली खास छाप सोडणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया, तिच्या आयटम साँगमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात आयोजित एका भव्य कार्यक्रमात तिने सादर केलेल्या सहा मिनिटांच्या नृत्य प्रदर्शनासाठी तिने तब्बल ६ कोटी रुपये मानधन घेतल्याचे समजत आहे.

या कार्यक्रमात तमन्नाने आपल्या लोकप्रिय 'आज की रात' या गाण्यावर दमदार डान्स सादर केला. तिच्या ऊर्जा, कमालीच्या स्क्रीन प्रेझेंस आणि स्टेजवरील आकर्षक परफॉर्मन्समुळे या नृत्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले आहेत. तमन्ना भाटियाने आपल्या एका मिनिटाच्या डान्ससाठी एक कोटी रुपये मानधन घेतल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे सहा मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी मिळालेली एकूण रक्कम ६ कोटी रुपये झाली आहे.

अभिनेत्री तमन्ना भाटिया आयटम साँगसाठी ओळखली जाते आणि 'जेलर'मधील 'कावाला', 'स्त्री २'मधील 'आज की रात', तसेच 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधील 'गाफूर' यांसारख्या गाण्यांनी तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. या कारणामुळे तिला 'आयटम साँग क्वीन' म्हणूनही ओळखले जाते.

Post a Comment

0 Comments