विजयराज डोंगरे अजितदादांच्या राष्ट्रवादीत दाखल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश!



राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश!
ज्येष्ठ नेते मनोहर भाऊ डोंगरे व त्यांचे चिरंजीव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराज डोंगरे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या उपस्थितीत बारामती येथील सहयोग सोसायटी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.

सामाजिक, शैक्षणिक व विकासाच्या क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेल्या या नेतृत्वामुळे पक्षाला नवी ताकद आणि ऊर्जा मिळाली आहे. डोंगरे परिवाराच्या या प्रवेशामुळे पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत झाली असून सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि तरुणांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. या माध्यमातून जनहिताचे कार्य सोलापूर जिल्ह्यात अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पुढे जाईल, असा मला विश्वास आहे.

सुनिल पाटील, बाबुराव कोकाटे, पैलवान नितीन निळे, दीपक पुजारी, सर्जेराव चवरे, सहदेव पुजारी, दीपक गवळी, सादिक तांबोळी, महावीर पुजारी, सागर थोरात, मुन्ना बचुटे या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला! 

Post a Comment

0 Comments