सोलापूर |
पोलीस पत्नीचे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना सोलापूर शहर पोलीस दलात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. सोलापूर शहर मोटार परिवहन विभागात कार्यरत असलेल्या एका 37 वर्षीय अविवाहित पोलीस हवालदाराने जीवन संपवले. घरातील छताच्या पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरेश चंदप्पा कोळी असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
सुरेश कोळी हे शहर मोटार परिवहन विभागात कार्यरत होते. ते मूळचे अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा येथील असून नोकरीनिमित्त सोलापुरातील कर्णिकनगर परिसरात वास्तव्यास होते. सोमवारी सकाळी 10 वाजता राहत्या घरात त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. याबाबत नातेवाईक शंकर शिवलिंगप्पा आयसार यांनी पोलिसांना माहिती दिली.
0 Comments