सुधाकर बर्गे यांचे निधन


कोल्हापूर |

शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि जनसंवाद विभागातील कनिष्ठ लेखनिक सुधाकर बर्गे (वय 56) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर येथील पंचगंगा नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

गेल्या पंचवीस वर्षाहून अधिक काळ ते पत्रकारिता विभागात सेवा करत होते. सुरुवातीला ते शिपाई म्हणून रुजू झाले होते. नंतरच्या काळात त्यांना कनिष्ठ लेखनिक पदी बढती मिळाली होती. विद्यार्थ्यांच्या मदतीला धावणारे कर्मचारी म्हणून ते परिचित होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments