गोविंदाच्या विवाहबाह्य संबंधांच्या वृत्ताला सुनीता आहूजा यांचा दुजोरा!


बॉलीवूडचा 'नंबर १' अभिनेता गोविंदा आणि त्याच्या पत्नीमधील वादाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. सुनीता आहूजा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदाच्या विवाहबाह्य संबंधांच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, यामुळे चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे, ज्या मुलीसोबत गोविंदाचे नाव जोडले जात आहे, ती कोणतीही अभिनेत्री नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

‘ई-टाइम्स’शी संवाद साधताना सुनीता यांनी २०२५ हे वर्ष त्यांच्यासाठी अत्यंत कठीण राहिल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, “मी २०२५ हे वर्ष माझ्यासाठी खूप वाईट मानते, कारण गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांनी मला खूप त्रास दिला. मला माहिती आहे की ती कोणी अभिनेत्री नाही, कारण अभिनेत्री अशा प्रकारचे वागणार नाहीत. ती मुलगी गोविंदावर प्रेम करत नाही, तिला फक्त त्यांच्या पैशात रस आहे.”

येत्या नवीन वर्षात आपल्या आयुष्यात काय बदल हवा आहे, यावर बोलताना सुनीता भावूक झाल्या. त्यांनी सांगितले की, “मला आशा आहे की गोविंदाला लवकरच आपली चूक उमजेल. प्रत्येकाच्या आयुष्यात आई, पत्नी आणि मुलगी या तीनच महत्त्वाच्या महिला असायला हव्यात. कोणत्याही पुरुषाला, अगदी गोविंदालाही आयुष्यात ‘चौथी’ महिला ठेवण्याचा अधिकार नाही.” गोविंदाने आपल्या सभोवतालचे ‘चमचे’ सोडून पुन्हा कामावर लक्ष केंद्रित करावे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर सुनीता यांनी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा निर्धार केला आहे. २०२५ मध्ये त्यांनी आपले यूट्यूब चॅनेल सुरू केले, ज्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. २०२६ साठी त्यांनी काही ‘न्यू इयर रिझोल्यूशन’ केले आहेत.

जुहू परिसरात स्वतःचे हक्काचे घर खरेदी करणे. घरी न बसता दिवस-रात्र काम करून यश मिळवणे. स्वतःसाठी एक आलिशान कार खरेदी करणे. “तिरस्कार करणाऱ्यांपेक्षा प्रेम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे मी कामात व्यग्र राहून २०२६ मध्ये एक खुशहाल कुटुंब पाहू इच्छिते,” असेही सुनीता यांनी शेवटी नमूद केले.

Post a Comment

0 Comments