श्री तुळजाभवानी मातेची 'मंचकी निद्रा' २० डिसेंबरला; सायंकाळच्या पूजाविधींच्या वेळेत बदल



​तुळजापूर: 

कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात येत्या शनिवारी, दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी देवीजींची 'मंचकी निद्रा' सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून पूजाविधींच्या वेळेत बदल करण्यात आले असून, याबद्दलचे जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

​श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० डिसेंबर २०२५ (शनिवार) रोजी सायंकाळच्या अभिषेक पूजेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

​असा असेल विधींचा सुधारित कार्यक्रम:

​सायंकाळी ५:३० वाजता: अभिषेक पूजेची घाट सुरू होईल.

​सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत: अभिषेक पूजा पूर्ण होईल.

​सायंकाळी ७:३० वाजेपर्यंत: त्यानंतर 'मेण काढणे' व इतर धार्मिक विधी पूर्ण केले जातील.

​सायंकाळी ७:३० ते ०८:००: या वेळेत श्री देवीजींची 'मंचकी निद्रा' हा मुख्य धार्मिक विधी पार पडणार आहे.

​तरी सर्व महंत, पुजारी, सेवेधारी आणि भाविक भक्तांनी या बदललेल्या वेळेची नोंद घ्यावी, असे आवाहन मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments