परंडा |
शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष पदाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांना एकूण मते ६७९५ मिळाली तर जनशक्ती नगर विकास आघाडीचे विश्वजित पाटील यांना ६६०६ मते मिळाली. यामध्ये सौदागर १८९ मतांनी विजयी झाले. तर नोटाला एकूण ६७ मते पडली. एकूण मतदान १३४६८ झाले. तर नगरसेवक पदाच्या २० जागांपैकी शिवसेना शिंदे गट ८ तर जनशक्ती विकास आघाडीला १२ जागांवर विजय मिळाला. जनशक्ती नगर विकास आघाडीच छत्री विरुध्द शिवसेना ( शिंदे ) धनुष्यबाण अशी टक्कर रंगली. नगराध्यक्ष पदासाठी २ तर सदस्यपदाच्या २० जागांसाठी ४३ जणांनी आपले नशिब अजमावले होते.
भूम परंडा येथे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात भाजप सह सर्वच पक्षांनी नाईट फिल्डिंग लावली होती. अत्यंत अतिथतीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये विश्वजीत पाटील यांचा निसटता पराभव झाला असला तरी जनशक्ती नगर विकास आघाडीचे १२ नगरसेवक निवडून आले असून शिवसेनेचे ८ नगरसेवक निवडून आले आहेत. जाकीर सौदागर यांच्या नगराध्यक्ष विजयावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीची जिल्हाभर चर्चा होती त्याचा निकाल आला आहे. एकीकडे सत्ताधारी शिवसेनेला मोठे यश मिळाले असून माजी आमदार राहुल मोटे व सुजित ठाकूर यांच्यासाठी हा जोरात धक्का मानला जात आहे.
परंडा नगरपरिषदेसाठी प्रभागणीय आकडेवारी व उमेदवाराला पडलेली मते...
प्रभाग १ अ - रत्नमाला बनसोडे ( आघाडी ९३८ मते , १७३ मतांनी विजयी ) तर आदिका पालके ( शिवसेना ७६५ मते ) , मिनाक्षी बनसोडे ( अपक्ष ६७ मते ) , सुवर्णा बनसोडे ( ४३ मते ). प्रभाग १ ब - श्रीकृष्ण विधाते ( आघाडी ९४६ मते , १०४ मतांनी विजयी ) ,संजय घाडगे ( शिवसेना ८४२ ) , प्रभाग २ अ - रुक्सानाबेगम पठाण ( आघाडी ६८१ मते , ६१ मतांनी विजयी ) , फर्जनाबी मुजावर ( शिवसेना ६२० ) , प्रभाग २ ब - सरफराज कुरेशी ( शिवसेना ६५१ मते , ८ मतांनी विजयी ), इस्माईल कुरेशी ( आघाडी ६४३ ) , प्रभाग ३ अ - परवीन बासले ( आघाडी ७६२ मते , १९८ मतांनी विजयी ), गुलनार पठाण ( शिवसेना ५६४ मते ) प्रभाग ३ ब - मदनसिंह सद्दीवाल ( आघाडी ७०९ मते , ९९ मतांनी विजयी ), मदन दीक्षित ( शिवसेना ६१० ) , प्रभाग ४ अ - मदीनाबी पठाण ( आघाडी ६४१ मते , ६४ मतांनी विजयी ), जैतुनबी पठाण ( शिवसेना ५७७ ) प्रभाग ४ ब - समरजीतसिंह ठाकुर ( आघाडी ६७६ मते , १४६ मतांनी विजयी ) , अजीम सौदागर ( शिवसेना ५३० ), नवनाथ कसबे ( अपक्ष १६ मते ) , प्रभाग ५ अ - शमीम तांबोळी ( शिवसेना ६९१ मते , १०१ मतांनी विजयी ) , नंदाबाई जाधव ( आघाडी ५९० मते ),प्रभाग ५ ब - सत्तार पठाण ( शिवसेना ६६३, ५० मतांनी विजयी ) , रईसोद्दीन मुजावर ( आघाडी ६१३ ) ,प्रभाग ६ अ - अनिल शिंदे ( आघाडी ७९२ , ३०६ मतांनी विजयी ) , जयंत शिंदे ( शिवसेना ४८६ ), प्रभाग ६ ब - वैशाली अलबत्ते ( आघाडी ७९२ , ३१२ मतांनी विजय ) , मनीषा मेहेर ( शिवसेना ४८० ), प्रभाग ७ अ - आब्बास मुजावर ( आघाडी ९४३ मते , ६४ मतांनी विजय ) ,इरफान शेख ( शिवसेना ८७९ मते ), प्रभाग ७ ब - रुखियाबी दहेलूस ( आघाडी ९४० मते , ६९ विजय ) , कमल जगताप ( शिवसेना ८७१ ), प्रभाग ८ अ - साबेर सौदागर ( शिवसेना ९३१ मते , ३९९ मतांनी विजयी ) , गुले इरम चौधरी ( आघाडी ५३२ ) , प्रभाग ८ ब - आमीनाबी मुजावर ( आघाडीच्या शोभा जाधव व अमिनाबी मुजावर ( शिवसेना १००२ मते , ५४६ मतांनी विजयी ) , शोभा जाधव ( आघाडी ४५६ मते ), प्रभाग ९ अ - मन्नाबी जिनेरी ( शिवसेना ५६८ मते , १७८ मतांनी विजयी ) , हसीना पठाण ( आघाडी ३९० ), प्रभाग ९ ब - चंद्रकांत गायकवाड ( शिवसेना ५२९ मते , ९६ मतांनी विजयी ) , उमाकांत गोरे ( आघाडी ४३३ ), प्रभाग १० अ - वनमाला शिंदे ( शिवसेना ५२५ मते , १४७ मतांनी विजयी ) , ज्योती सोनटक्के ( आघाडी ३७८ मते ) तर १० ब - रमेशसिंह परदेशी ( आघाडी ४६० मते , २३ मतांनी विजयी ) व मोहसीन सौदागर ( शिवसेना ( ४३७ मते )
0 Comments