भारतीय क्रिकेटमध्ये ‘भूकंपाचे’ संकेत! हार्दिक पंड्या टी-20चा ‘फुल टाईम’ कॅप्टन होणार


मुंबई : 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भविष्याचा विचार करून आखलेला कर्णधारपदाचा 'रोडमॅप' सध्या एका अनपेक्षित वळणावर येऊन थांबला आहे. टीम इंडियाचा भावी 'ऑल फॉरमॅट' लीडर म्हणून ज्या शुभमन गिलकडे पाहिले जात होते, तो प्रयोग फसला असल्याचे आता स्पष्ट होत आहे. खराब फॉर्ममुळे गिलचे टी-२० मधील स्थान धोक्यात आले असून, आगामी इंग्लंड दौऱ्यापूर्वी निवड समितीला पुन्हा एकदा नव्या कर्णधाराचा शोध घ्यावा लागणार आहे. या शर्यतीत आता हार्दिक पंड्याचे नाव पुन्हा एकदा आघाडीवर आले आहे.

शुभमन गिलचा ‘फ्लॉप शो’ आणि निवड समितीचा मोहभंग

अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने शुभमन गिलला भविष्यातील सुपरस्टार म्हणून झुकते माप दिले होते. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर गिलकडे टी-२० ची उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र, ‘प्रतिष्ठेपेक्षा कामगिरी महत्त्वाची’ या गौतम गंभीर आणि आगरकर यांच्या धोरणामुळे गिलला मोठा धक्का बसला आहे.

गेल्या १५ डावांमध्ये गिलला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. द. आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत सुरुवातीच्या तीन सामन्यांमध्ये त्याने ४, ० आणि २८ धावा केल्या. या खराब कामगिरीमुळे निवड समितीचा संयम सुटला. लखनऊमध्ये झालेल्या बैठकीत गिलच्या टी-२० भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आणि संजू सॅमसनला सलामीला संधी देऊन बीसीसीआयने स्पष्ट संकेत दिले की, आता केवळ नावावर कोणालाही संघात स्थान मिळणार नाही.

Post a Comment

0 Comments