धाराशिव |
स्वराज्य संस्था निवडणुक २०२५ चे अनुषंगाने निवडणुक आदर्श आचार सहितेच्या काळात व नाताळ तसेच ३१ डिसेंबर चे अनुषंगाने दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक जि.धाराशिव विभागाने विभागाचे आयुक्त मा.श्री. डॉ. राजेश देशमुख, मा.श्री. प्रसाद सुर्वे सहआयुक्त, (दक्षता व अंमलबजावणी) राज्य उत्पादन शुल्क, श्रीमती संगीता दरेकर, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, छ. संभाजीनगर विभाग छ. संभाजीनगर, श्री. हर्षवर्धन शिंदे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जि. धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली मौजे. वाशी ता.वाशी जि.धाराशिव येथे अवैधरित्या गोवा राज्य निर्मीत व केवळ गोवा राज्यात विक्रीस असलेली विदेशी दारु व गुन्हयात वापरलेली महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ जिचा नोंदणी क्र. MH-२५-R-३८३५ तसेच गुन्हयात वापरलेली महिंद्रा कंपनीची XUV ५०० जिचा नोंदणी क्र.IIR-५१-AT-९४८६ अशी दोन चारचाकी वाहने व इतर साहित्य जप्त करून गुन्हा नोंद करून ०२ आरोपी नामे तानाजी अंबऋषी लटके, वय ४० वर्षे, रा. सरकारी गोडाऊनच्या पाठीमागे वाशी ता. वाशी जि.धाराशिव २) अविनाश नामदेव पवार, वय ३१ वर्षे, रा.ब्राम्हण गल्ली, दत्त मंदिरजवळ वाशी ता. वाशी जि. धाराशिव यांना अटक करुन एकूण रु.१३,८१.१२०/- चा प्रो.गुन्हेतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्री. हर्षवर्धन शिंदे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जि.धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली बाळकृष्ण ढोकरे, प्र.निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, जि. धाराशिव, सोबत आर. के बागवान दु.नि, ए.ए. गवंडी, टी.एच. नेर्लेकर, ए.सी. खराडे, ए.डी. गटकांबळे, संतोष कलमले, महिला जवान ऐश्वर्या इंगळे, तसेच निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, धाराशिव व भुम यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी सदरची कारवाई यशस्वी केली असुन पुढील तपास बाळकृष्ण ढोकरे, प्र.निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, जि. धाराशिव हे करीत आहेत.
0 Comments