'10 कोटींची भरपाई द्या', ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपीची ओमराजे निंबाळकरांना नोटीस


तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरण विधिमंडळ अधिवेशनात गाजत असताना दुसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकर यांना ड्रग्ज प्रकरणातील आरोपी तथा भाजपचे तुळजापूर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद गंगणे यांनी अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी चुकीचे आरोप केले त्यामुळे समाजात प्रतिष्ठा मलीन होऊन बदनामी झाली, असे गंगणे यांच्या नोटीसीत म्हटलं आहे. ओमराजे निंबाळकरांनी सोशल मीडियावरून आरोपांचा व्हिडीओ मागे घ्यावा आणि सार्वजनिक माफी प्रसिद्ध करावी, असंही नोटीसमध्ये म्हटलं आहे.

तसेच अब्रूनुकसानीच्या भरपाई पोटी 10 कोटी द्या. अन्यथा दिवाणी व फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करू असं म्हटलं आहे. विनोद गंगणे यांनी अॅड. अंगद पवार यांच्यामार्फत खासदार ओमराजे निंबाळकर आणि धाराशिव लाईव्हचे संपादक सुनील ढेपे यांना ही नोटीस पाठवली आहे.

वकील अंगद पवार यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना पाठवलेल्या नोटीसीत असे म्हटले आहे की, विनोद गंगणे हे तुळजापूर येथील राजकीय प्रतिष्ठित व्यक्ती असून समाजात त्यांना मान आहे. त्यांच्याकडे तुळजापूर शहराच्या राजकारणातील महत्त्वाचा केंद्रबिंदु म्हणुन पाहतात. 

Post a Comment

0 Comments