सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रहिवासी आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेख याच्यासह चौघांना पंजाब पोलिसांच्या सीआयए (CIA) पथकाने शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली आहे. या घटनेने महाराष्ट्रासह देशभरातील कुस्ती क्षेत्रात धक्का बसला आहे.
मोहाली पोलिसांच्या माहितीनुसार, आंतरराज्यीय शस्त्र पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून, या टोळीतील चार सदस्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू सिकंदर शेख याचाही समावेश आहे. प्राथमिक तपासानुसार, ही टोळी शस्त्र तस्करी, खंडणी आणि खूनाच्या प्रकरणांमध्ये सहभागी होती.
राजस्थानातील पपला गुर्जर टोळीशी संबंध?
पोलिस तपासात असे समोर आले आहे की, या टोळीचे संबंध राजस्थानमधील कुख्यात पपला गुर्जर टोळीशी आहेत. सिकंदर शेखचा या टोळीसोबत संपर्क असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
कुटुंबाचा आरोप - "खोटं अडकवलं"
दरम्यान, सिकंदर शेखच्या कुटुंबीयांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी सांगितले की, "सिकंदर हा प्रामाणिक खेळाडू आहे, त्याला राजकीय आणि वैयक्तिक कारणांमुळे खोट्या गुन्ह्यात ओढले जात आहे."
ही घटना कुस्ती क्षेत्रातील अनेकांसाठी धक्कादायक आणि चिंताजनक ठरली आहे. पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे
0 Comments