परंडा
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात एका बोलेरो गाडीने मोटारसायकलला दिलेली धडक यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २ ऑक्टोबर रोजी, परंडा-खासापुरी रोड वरील रहेमुतुल्लाखॉ पठाण यांच्या शेताजवळ हा दुर्घटना घडली. आरोपी राजेंद्र भैरवनाथ शिंदे (वय ४१, खासापुरी) याने चालवलेल्या बोलेरो गाडी (MH23 N 5236) ने सुधीर नवनाथ देडगे (वय ५०) यांनी चालविलेल्या मोटारसायकलला मागून धडक दिली. या जोरदार धडकीमध्ये मोटारसायकलवरून पडून सुधीर देडगे ताबडतोब मृत झाले. मोटारसायकलवर बसलेले सुधीर यांचे पुत्र महेश सुधीर देडगे (वय १९) गंभीर जखमी झाले. दोघेही खासापुरीतील चव्हाणवाडी येथले रहिवासी होते.
देडगे कुटुंबातील सदस्य कमलाकर नवनाथ देडगे (वय ४८) यांनी दिनांक २ ऑक्टोबर रोजीच परंडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी राजेंद्र शिंदेविरुद्ध विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे:
0 Comments