धाराशिव| अतिवृष्टी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या




धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांचे आत्महत्येचे सत्र सुरू आहे. गेल्या २४ तासांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असून, यापैकी एक धाराशिव तालुक्यातील वाखरवाडी येथे राहणारे ५५ वर्षीय पोपट केशव पवार यांनी गुरुवारी सकाळी विष प्राशन करून आपले जीवन संपवले.

पोपट पवार गेल्या अनेक वर्षांपासून कर्जबाजारी होते. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात झालेले नुकसान आणि वाढलेले कर्ज यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या मृत्यूमागे अतिवृष्टी हे एक प्रमुख कारण असल्याचे नमूद केले गेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले अशी कुटुंबीय सदस्य राहिली आहेत.

घटनेनंतर कळंब धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी रुग्णालयात हजेरी लावून पोपट पवार यांच्या कुटुंबीयांना सांत्वनपर भेट दिली आणि त्यांना आधार दिला. धाराशिव जिल्ह्यात सात महिन्यात ८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे आकडे समोर आहेत, जे या प्रदेशातील शेतकऱ्यांच्या कठीण परिस्थितीचे दर्शक आहेत.

Post a Comment

0 Comments