श्री क्षेत्र तुळजापूर येथील शारदीय नवरात्र महोत्सवात आज बुधवार रोजी श्री तुळजाभवानी देवींची नित्योपचार पूजा संपन्न झाली. शारदीय नवरात्रीतील आजची तिसरी माळ आहे.
पहाटे ६ ते सकाळी १० या वेळेत देवींची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती करण्यात झाली. काल मंगळवारी श्री तुळजाभवानी देवींची सिंह या वाहनातून छबिना मिरवणूक काढण्यात आली. छबिना मिरवणूकीला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शारदीय नवरात्र महोत्सवातील पूजा-अर्चा आणि छबिना मिरवणूकीने तुळजापूर नगरीत उत्साहाचे वातावरण आहे. पुढील आठ दिवस धार्मिक तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्मिक समाधानाचा अनुभव घेता येणार आहे.
0 Comments