१८ ग्रामपंचायतींचा पाठिंबा
धाराशिव दि.२१ (प्रतिनिधी) - तालुक्यातील करजखेडा येथील शेतकरी सहदेव व पत्नी प्रियंका पवार या दोघांची चार चाकीने धडक देऊन धारदार शस्त्रांनी वार करीत धड वेगळे करणाऱ्या आरोपींसह त्यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांना अटक करावी. मकोका कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच ते प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या दोन चिमुकल्या मुलींसह नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमच्या मम्मी - पप्पांना न्याय मिळवून द्या असा हृदय पिळवटून टाकणारा, काळीज कुर्तडणारा व मन हेलावून डोळ्यांच्या कडा अश्रूच्या धारांनी आपोआपच घळघळा ढासळविणारा हृदयस्पर्शी हंबरडा फोडीत व आक्रोश करीत आमच्या मम्मी - पप्पांना न्याय मिळवून द्या या मागण्यांसाठी दि.२१ ऑगस्ट रोजी आंदोलन केले. दरम्यान, या समर्थनार्थ १८ ग्रामपंचायती व स्वराज्य संघटनेच्यावतीने सर्व आरोपींना मकोका कायद्यान्वये गुन्हे दाखल करून सर्वांनाच फाशीची शिक्षा देण्यात यावी, असा ठराव घेऊन चिमुकल्यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव तालुक्यातील करजखेडा येथील सहदेव पवार व त्यांची पत्नी प्रियांका या पती-पत्नीचा दि.१३ ऑगस्ट रोजी करजखेडा येथील चौकात असलेल्या कृषी दुकानातून शेती पिकास फवारणी करण्यासाठी लागणारी औषधे खरेदी करण्यासाठी ते पती-पत्नी मोटारसायकलवरुन चालले होते. चौकात आल्याबरोबर चार चाकी गाडीने धडक देऊन त्यांच्यावर अंगावर हरिबा यशवंत चव्हाण व जीवन हरीबा चव्हाण यांनी धारदार शस्त्र कोयत्याने सपासप वार करीत प्रियंका यांचे शीर व धड वेगळे केले. तर सहदेव यांच्यावर १०-१५ वार करून जाग्यावरच जीवे ठार मारले. त्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या खुनाच्या कटामध्ये सहभागी असलेल्या व हे पती-पत्नी मोटारसायकलवरुन कुठे चालले आहेत, कुठपर्यंत आले आहेत ? याची इथंभूत माहिती फोनद्वारे देणाऱ्या इतर सर्व सहभागी आरोपींना अद्यापही पोलिसांनी अटक केलेली नाही. त्यामुळे सर्वांना अटक करून त्यांच्यावर मकोका कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे. तसेच त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यामध्ये सहदेव व प्रियंका आराध्या व संजना या दोन चिमुकल्या मुलींसह त्यांच्या आई लिलावती भागवत पवार, वडील भागवत पवार, हिराबाई साळुंके, मैनाबाई लोटकर, रंजना मोहाळे, प्रणिता साळुंके, अनिता साळुंके, ललिता साळुंके, सविता साळुंके, राधिका गुरटुकने, विजया गायकवाड, स्वाती चव्हाण, मैना थोरात, कविता साळुंखे, केशरबाई मोहाळे, अंकीता सुरवसे, मनिषा मोहाळे, वर्षा लोटकर, सरस्वती साळुंके, राऊबाई साळुंके, रुक्मीन पवार, सुभाष साळुंके, दिलीप साळुंके, आकाश साळुंके, शाहूराज साळुंके, कविता साळुंके, महेश साळुंके, लक्ष्मण सुर्यवंशी, बबन मोहळे, संभाजी मुसांडे आदींसह इतर सहभागी झाले होते.
.......
प्रकरण जलद गती न्यायालयात चालविण्यासह आरोपींना फाशी देण्यात यावी असा ठराव १८ ग्रामपंचायती घेतला आहे. तर स्वराज्य संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष महेश गवळी यांनी देखील तसाच ठराव घेऊन पवार यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. या ग्रामपंचायतमध्ये लोहारा तालुक्यातील धानोरी, माकणी, काटी चिंचोली, तोरंबा, करवंजी, राजेगाव, एकोंडी (लो), कोंडजी (गड), मुर्शदपूर, चिंचोली (रेबी), होळी, सालेगाव, सास्तुर, खेड, हराळी, हिप्परगा (सय्यद), लोहारा (खुर्द) व तावशी (गड) यांचा समावेश आहे.
0 Comments