परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत अत्यंत जीर्ण झाली, असून केव्हाही खाली कोसळू शकते. अशा शाळेतच विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. यासंदर्भात ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार विनंती करून देखील आश्वासनाखेरीज कोणतीच ॲक्शन न झाल्यामुळे संतप्त पालकांनी १०.३० ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता शाळेला टाळे ठोकले.
परंडा तालुक्यातील सिरसाव येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते दहावी शाळा आहे. संपूर्ण शाळा मात्र समस्येच्या विळाख्यात आहे. शाळेच्या इमारती शेजारी ग्रामस्थांनी केलेले अतिक्रमण, शाळेतच असणारे खाजगी शौचालय, तज्ञ अनुभवी शिक्षकाची कमतरता, स्वच्छालयाची नसणारी सोय यास अन्य समस्येच्या विळख्यात आहे. या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासन मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. जिल्हा परिषद शाळेच्या दयनीय अवस्थेला जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे. ह्या भीषण समस्येचा विद्यार्थी सामना करत असतानाच स्थानिक स्तरावर झालेल्या बैठकीनंतर प्रशासनाच्या उदासीन धोरणाविरुद्ध शाळेला टाळे ठोकण्याचा निर्धार केला. गेल्या दोन वर्षापासून अर्ज, विनंत्या पाठपुरावा करून देखील जिल्हा प्रशासनाने इमारतीकडे लक्ष दिले नाही. अतिशय जिर्ण झालेल्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.
इयत्ता पहिली ते चौथीसाठी असणारी शाळेची इमारत अत्यंत जीर्ण झाली असून त्या इमारतीचे डफले आपोआपच पडत आहेत. या चार वर्गात मिळून ९६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का असा प्रश्न विचारत ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. जोपर्यंत जीर्ण इमारतीचा प्रश्न शासन सोडवणार नाही तोपर्यंत शाळा भरू दिली जाणार नाही असा आक्रमक पवित्राही पालकांनी घेतला आहे, पालकांच्या भूमिकेला विद्यार्थी ही समर्थन देत आहेत.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाजी चोबे, उपाध्यक्ष समाधान देवराम, माजी उपसरपंच आबासाहेब मुके, ग्रामपंचायत सदस्य मुकुंद चोबे, सामाजिक कार्यकर्ते अनंत जाधव, बालाजी आनंदराव पाटील, प्रदीप देवराम, दादा पाटील, संदीप पाटील, दादा जाधव, अनंत चोबे यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवसेंदिवस जिल्हा परिषद शिक्षणाची वाईट स्थिती होत चालली आहे, त्यातच भरीत भर म्हणजे इमारत जीर्ण अवस्थेत, याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारत तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
- उमेश जाधव महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी आघाडीचे जिल्हाप्रमुख
या इमारती संदर्भात गेल्यात दोन वर्षापासून प्रशासनाकडे वारंवार अर्ज विनंती करून देखील शासन बघायची भूमिका घेत असल्यामुळे जिल्हा परिषदेसमोर तीव्र आंदोलन करणार असा इशारा दिला.
- सामाजिक कार्यकर्ते आनंद जाधव
0 Comments