तुळजापूर ऑनलाइन फसवणूक शासनाच्या बंदीविरुद्ध जुगार साइटद्वारे १६.८५ लाख रुपयांची लूट; सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवला



तुळजापूर |

शासनाच्या स्पष्ट बंदीविरुद्ध ऑनलाइन जुगाराची बनावट लिंक पाठवून स्थानिक नागरिकाच्या मुलासह सुमारे १६.८५ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. फिर्यादी कालीदास लिंबाजी गवळी (वय ५४, शुक्रवार पेठ, कणे गल्ली, तुळजापूर) यांनी दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी सायबर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ७८, ३५६(२) सोबत माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६(सी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

फिर्यादी कालीदास गवळी यांचा मुलगा कृष्णा याला जास्त पैशाचे आमिष दाखवण्यात आले. "exchange.com" या बनावट वेबसाइटद्वारे ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी प्रलोभन दिले गेले. शासनाने ऑनलाइन जुगारावर घातलेली बंदी असतानाही अनेक मोबाइल नंबरद्वारे व्हॉट्सअपवर ही लिंक पाठवण्यात आली. या फसवणुकीत सुमारे १६,८४,४९८ रुपयांचे नुकसान फिर्यादीला सहन करावे लागले आहे. या नंबरद्वारे त्यांनी बनावट लिंक पाठवली आणि फिर्यादीच्या मुलाला ऑनलाइन जुगार खेळण्यास प्रवृत्त केले. 

Post a Comment

0 Comments