धाराशिव | वाईन शॉप चालकाला धमकी, खंडणीची मागणी; भूम पोलिसात गुन्हा दाखल



भूम शहरातील एका वाईन शॉप चालकाकडे खंडणीची मागणी करून, दुकान फोडण्याची धमकी दिल्याप्रकरणी अक्षय विनोद गायकवाड या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यवस्थापक संदीप कान्होरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीने १२ ऑगस्ट रोजी रात्री दुकानात येऊन एक हजार रुपयांची खंडणी मागितली. 

खंडणी न दिल्यास दुकान चालू देणार नाही, अशी धमकी देत त्याने तीन बिअरच्या बाटल्याही जबरदस्तीने नेल्या. यापूर्वीही आरोपीने दोन हजार रुपयांची खंडणी मागितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या सततच्या त्रासामुळे कान्होरे यांनी १४ ऑगस्ट रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली, ज्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments