तानाजी सावंत यांचे मंत्रिमंडळात पुन्हा कमबॅक होणार? सावंताच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह


शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे तानाजी सावंत यांच्या मनात नेमकं काय सुरुय याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. महायुती सरकारच्या दुसर्‍या टर्ममध्ये सावंतांना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर त्यांनी मतदारसंघाकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. धाराशिवमध्ये शिवसेना समन्वयक राजन साळवी यांच्या बैठकीअगोदर राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आलं. धाराशिव जिल्ह्यातलंं शिवसेनेचं मोठं प्रस्थ असलेल्या माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना थेट शिवसेनेच्या कार्यक्रमातून डावलल्यानं पुन्हा एकदा नवा राजकीय वाद पेटला आहे. यानंतर काही तासातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यामध्ये सावंत यांची भेट घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर समोर आल्याने सावंत समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आपल्या नेत्याला पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न असल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. ही भेट सावंत यांच्या राजकीय भवितव्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते, असेही बोलले जात आहे.


दुसरीकडे, तानाजी सावंत यांच्यावरील आधीचे भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यांचे भडक बोलणे यामुळे त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता कमी असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळे, एकनाथ शिंदे त्यांच्या नाराजीवर फुंकर घालण्यासाठी गेले होते की खरंच त्यांना पुन्हा मंत्रिपद देण्याचा विचार सुरू आहे, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे काही मंत्री भ्रष्टाचार, वादग्रस्त तसेच असंवेदनशील वक्तव्ये यामुळे अडचणीत आले आहेत. विरोधी पक्षाकडून या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहेत. या पार्श्वभूमीवर मतदारसंघांमध्ये साहेब मंत्री होणार अशा चर्चा होताना पाहावयास मिळत आहेत.

Post a Comment

0 Comments