धाराशिव |
तालुक्यातील एका गावामध्ये लग्नाचे अमिष दाखवून ३२ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला आहे. सण २०२१ ते २६ फेब्रुवारी २०२५ या काळामध्ये गावातीलच तरुणाने वारंवार लैंगिक अत्याचार केला. जातीवाचक शिवीगाळही करण्यात आली.
याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार एका तरुणा विरोधात बेंबळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद ५ एप्रिल रोजी करण्यात आली. अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने ६ एप्रिल रोजी प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.
0 Comments